कणकवली (प्रतिनिधी) : श्री देव पाचोबा देवस्थान येथे श्री रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात 30 मार्च रोजी साजरा करण्यात येणार असून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता सत्यनारायण पूजा संपन्न होणार असून दुपारी 12 ते 3 या वेळेत महाप्रसाद वाटप होणार आहे. दुपारी 3 ते 6 या वेळेत हळदीकुंकू कार्यक्रम होणार असून सायंकाळी 6 ते 7 या वेळेत महिलांसाठी होममिनिस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी 7 ते 9 फनिगेम्स होणार असून रात्री 9 ते 12 वाजण्याच्या दरम्यान स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ तांबोळी यांचे भजन होणार आहे.तसेच स्थानिकांची भजन होणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन श्री देव पाचोबा देवस्थान मित्रमंडळ डामरे – फोंडाघाट च्या वतीने करण्यात आले आहे.
श्री देव पाचोबा देवस्थानकडे रामनवमी उत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम












