नवनिर्वाचित सभापतींचे आमदार नितेश राणे यांनी केले अभिनंदन
वैभववाडी (प्रतिनिधी) : वाभवे–वैभववाडी नगरपंचायतच्या विषय समिती सभापती पदाच्या निवडी पार पडल्या. ही निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी भाजपाच्या यामिनी वळवी यांची बिनविरोध निवड जाहीर झाली आहे. सार्वजनिक बांधकाम नियोजन व विकास समिती सभापतीपदी भाजपचे विवेक सज्जन रावराणे, आरोग्य, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापतीपदी भाजपाचे राजन तांबे यांची निवड झाली आहे, महिला व बालकल्याण समिती उपसभापतीपदी भाजपाच्या संगीता चव्हाण यांची निवड जाहीर झाली आहे. बांधकाम सभापतीपदी भाजपने पुन्हा विवेक रावराणे यांना संधी दिली आहे. नूतन सभापती व उपसभापती यांचे आमदार नितेश राणे, वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी यांनी अभिनंदन केले.