वैभववाडी तालुक्यात एसटी डेपो उभारण्याची मागणी

वैभववाडी (प्रतिनिधी) : ‌वैभववाडी तालुक्यात एसटी डेपो उभारण्यात यावा. या मागणीचे निवेदन पालकमंत्री नितेश राणे यांना सामाजिक कार्यकर्ते डी. के. सुतार यांनी दिले आहे. या निवेदनात विविध मागण्यांचा देखील समावेश आहे. त्यामध्ये तालुक्यातील एसटी गाड्यांची संख्या वाढविणे, मानव विकास योजनेअंतर्गत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्व गाड्या सुरू कराव्यात, वैभववाडी एसटी स्टँड ची इमारत  नव्याने बांधण्यात यावी, स्टँड परिसरात सुलभ शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, बस स्थानकात हायमास्ट उभारण्यात यावा, गेट समोर गतिरोधक बसविण्यात यावा, बस स्थानकात पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी, बस स्थानकात वाहतूक नियंत्रक कामाची वेळ सकाळी ७ ते रात्री १० अशी वाढविण्यात यावी, दूरध्वनी क्रमांक चालू करण्यात यावेत, सुक व शांती नदीवर सुरू असलेले पुलाचे काम हे दर्जेदार करण्यात यावे, अशा विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

error: Content is protected !!