वैभववाडी (प्रतिनिधी) : गेली सव्वा वर्ष कोल्हापूर वाहतुकीसाठी बंद असलेला तळेरे-वैभववाडी करूळ घाटरस्त्याची एकेरी वाहतूक अखेर आज सुरू करण्यात आली.
तळेरे वैभववाडी करूळ गगनबावडा कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गचे काम सुरू झाल्यापासून हे काम अतिशय धिम्या गतीने चालू होते. कामाचा दर्जा योग्य नसल्याचे लक्षात येताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने वेळोवेळी आंदोलने करून राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांना जागे करण्यासाठी प्रयत्न केले. तसेच घाट पूर्ण झाल्यानंतर सुध्दा पावसाळ्यात या घाटात केलेल्या कामाचा बराचसा भाग खचला व भिंती कोसळल्या होत्या. तरी सुद्धा याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दुर्लक्ष करत होते. यासाठी सुद्धा खारेपाटण येथील कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करून प्रशासणाला जागे केले.
तसेच या घाटाची वाहतून सुरू करण्यासाठी माजी आमदार वैभव नाईक,राजन तेली, सतिश सावंत, सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन लवकरात लवकर हा घाट वाहतुकीसाठी चालू करावा अन्यथा शिवसेना हा महामार्ग प्रशासनाला सुरू करण्यासाठी भाग पाडेल असा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतरच प्रशासनाने या कामाची गती वाढवुन हे काम जवळ-जवळ ९०/% पूर्णत्वास नेले व एकेरी वाहतुकीला हा घाट सुरू करण्यात आला. त्याबद्दल जिल्हाधिकारी यांचे खास अभिनंदन. तसेच उर्वरित कामे सुद्धा चांगल्या प्रकारे करावीत अशी मागणी लोके यांनी केली आहे.











