पोलिस अधिक्षकांनी जेष्ठ नागरिक संघ पदाधिकाऱ्यांचा केला सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या वतीने कुडाळ येथे आयोजित जेष्ठ नागरिक मेळावा यशस्वी होण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल यांच्या हस्ते जेष्ठ नागरिक संघाचे समन्वयक सीताराम उर्फ दादा कुडतरकर, जिल्हाध्यक्ष भालचंद्र मराठे, सल्लागार अशोक करंबेळकर, जिल्हा सचिव सखाराम सपकाळ आदींचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. जेष्ठ नागरिक मेळावा आयोजित करून जेष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी पोलिस दलाच्या वतीने हेल्पलाईन सुरू करण्यात आली. तसेच आंगणेवाडी भराडी देवीच्या यात्रेत यावर्षी प्रथमच सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या वतीने जेष्ठ नागरिकांसाठी विशेष विश्रांती कक्ष स्थापण्यात आला होता. या विश्रांती कक्षाचा फायदा हजारो जेष्ठ नागरिकांना झाला. सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या या अभिनव उपक्रमांबद्दल जेष्ठ नागरिक संघाकडून एसपी अग्रवाल याचे आभार मानण्यात आले.

error: Content is protected !!