उपनेते संजय आग्रे यांनी केली हेलिपॅड ची पाहणी
देवगड (प्रतिनिधी) : महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर दक्षिण कोकणाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव कुणकेश्वर मंदिरात यात्रा आयोजित केली जाते. या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब हे श्री देव कुणकेश्वर व आगणेवाडी येथील श्री भराडी देवी आई यांच्या दर्शनासाठी उद्या, २६ फेब्रुवारी रोजी भेट देणार आहेत.
त्यांच्या या दौऱ्याच्या अनुषंगाने देवगड येथे हेलिपॅड व्यवस्थेची प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत पाहणी करण्यात आली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बापू धुरी, शिवसेना देवगड तालुकाप्रमुख अमोल लोक, प्रणय सावंत यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उपमुख्यमंत्र्यांच्या या भेटीमुळे महाशिवरात्री यात्रेला विशेष महत्त्व प्राप्त होणार असून, कुणकेश्वर व आगणेवाडी परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.











