इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत धमकीप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : कोल्हापूर,इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोनवरून देण्यात आलेल्या धमकीप्रकरणी त्यांनी आज जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्याकडील फोन रेकॉर्डिंग देखील त्यांनी पोलिसांकडं जमा केले आहे.

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना प्रशांत कोरटकर यानं फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल सावंत यांनी कोरटकरच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. मला फोन करण्यापूर्वी, प्रशांत कोरटकर कुणाला भेटत होता?, काय करत होता?, याची चौकशी करण्याची मागणीही सावंत यांनी केली. पोलिसांनी इंद्रजीत सावंत यांचा आज दुपारी जबाब नोंदवला. यावेळी सावंत यांनी त्यांच्याकडील फोन रेकॉर्डिंग, पोलिसांना दिले आहेत. त्याचबरोबर कोरटकरवर तातडीनं गुन्हा दाखल होऊन कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.कोरटकर यानं ज्याप्रकारे, इंद्रजीत सावंत यांना धमकी दिलीय ते पाहता त्याच्यामागं कुणी तरी गॉड फादर असल्याचं जबाबात त्यांनी म्हटले. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाची तळापर्यंत जाऊन चौकशी करण्याची मागणी सावंत यांनी पोलिसांकडं केली आहे.

error: Content is protected !!