कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेला “AaGaaz Fashion Runway 2026” हा भव्य आणि आकर्षक फॅशन शो मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध थीम्समुळे हा कार्यक्रम विशेष ठरला.या कार्यक्रमाला उद्घाटक संदेश पारकर (नगराध्यक्ष, कणकवली), सुशांत नाईक (उपनगराध्यक्ष), माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, सुमेध नाडकर्णी, सचिन बोराटे, सार्था कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच रुपेश नार्वेकर, जयेश धुमाळे, जुई मुरकर, दीपिका जाधव, रामदास विखाळे, सत्यजीत पारकर, समृद्धी पारकर, सौरभ पारकर, दिवाकर मुरकर, किशोर कदम नेहा कदम, आर्या कदम,,सिध्देश महाजन, बंटी पिळणकर, संतोष पुजारे, बबली राणे, वैभव मांलडकर, आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी Mho7 चे विलास कोरगावकर, GS कलेक्शनचे सुरज रणशुर, निनाद कन्स्ट्रक्शनचे निनाद विखाळे, वोग कलेक्शनचे ओम आळवे, स्नेहा इन्स्टिट्यूट हॉटेल मॅनेजमेंटचे टिकले, विल्सन प्रॉपर्टीज, हॉटेल मालवणी गजाली यांचेही सहकार्य लाभले.संदेश पारकर यांचे मत“फ्लोरेट कॉलेजसारख्या संस्थेमुळे आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची ताकद मिळते. ‘AaGaaz 2026’ हा फक्त फॅशन शो नसून विद्यार्थ्यांच्या कष्ट, कल्पकता आणि आत्मविश्वासाचा सुंदर उत्सव आहे.या मंचावर उभे राहून विद्यार्थ्यांनी दाखवून दिले की संधी मिळाली तर आपला सिंधुदुर्ग कुठल्याही मोठ्या शहरांपेक्षा कमी नाही. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना नवी दिशा, नवे व्यासपीठ आणि उज्ज्वल भविष्य मिळते. संचालिका सार्था कदम यांचे विशेष अभिनंदन. सर्वांनी मिळून सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन उद्योजक निर्माण करण्यासाठी प्रयत्न करूया,” असे संदेश पारकर यांनी सांगितले.यावेळी पी. जे. कांबळे (मुख्याध्यापक, विद्यामंदिर हायस्कूल), वामन तर्फे (मुख्याध्यापक, शिरवंडे हायस्कूल), सुमंत दळवी मुख्याधपक कनेडी हायस्कूल,दत्तात्रय केसरकर (गुरुकुल अकॅडमी), राखी अरदकर (कला शिक्षिका, टोपीवाला हायस्कूल) मंदार सुतार मुंबई यांना फ्लोरेट कॉलेजच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाची वैशिष्ट्येया शोमध्ये सुमारे 150 कलाकार (डिझायनर, मेकअप आर्टिस्ट, मॉडेल) सहभागी झाले होते. १st Year विद्यार्थ्यांची थीम्स गंजिफा (Ganjifa)सावंतवाडीच्या पारंपरिक गंजिफा कलेला आधुनिक फॅशनची जोड देत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. Best Theme Awardकाजल गावडे – Best Designer Award (2nd Prize)विद्यार्थी:आर्या जळवी, श्रेया जळवी, काजल गावडे, अन्वी हर्ने, रिया परब, रासिका सातार्डेकर, साक्षी राऊळचित्रकथी (Chitrakathi)पिंगुळी गावातील पारंपरिक चित्रकथी कलेवर आधारित ही थीम विशेष आकर्षण ठरली. युग (Yuga Theme)सत्ययुग ते कलियुग या संकल्पनांवर आधारित सादरीकरण. निपूर्णा आडकर – Best Designer Award (3rd Prize)२nd Year विद्यार्थ्यांची थीमअरण्य (Aranya)निसर्ग आणि जंगलावर आधारित प्रभावी सादरीकरण.सेजल परब – 1st Prize Best Designer Award ३rd Year विद्यार्थ्यांची थीमआर्किटेक्चर (Architecture Theme)शीश महाल, लाल किल्ला यांसारख्या वास्तूंवर आधारित डिझाईन्स. मॉडेल पुरस्कारBest Female Model – सानिका दळवीBest Male Model – वेदांत हडकरKid’s Model – आद्या रासमपरीक्षक मंडळमुंबईतील सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर सागर कजरेकर, माधवी शिवापुरकर, राखी अरदकर, नरेंद्र राणे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. विशेष आभारफॅशन विभागातील प्राध्यापक — श्रुती सावंत, अमेय हिर्लेकर, भाग्यश्री कुंभार, प्रियांका शिरोडकर यांचे विशेष योगदान लाभले.अॅडमिन स्टाफ — शैलेश कदम, सायली डामरी तसेच सोशल मीडिया हेड सम्मेद जैन , फोटोग्राफर चैतन्य पवार व चिन्मय सरमळकर संगीत,अमर पवार,यांनीही मोलाची भूमिका बजावली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिने अभिनेते निलेश पवार यांनी केले.प्रास्ताविक किशोर कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन नेहा कदम यांनी मानले.AaGaaz 2026” हा केवळ फॅशन शो नसून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा, परंपरेचा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम ठरला.”
सिंधुदुर्गात पहिलाच “AaGaaz Fashion Runway 2026” जल्लोषात; फ्लोरेट कॉलेजच्या विद्यार्थ्यांची सर्जनशीलतेची दिमाखदार झलक












