भाजप बांदा शहराध्यक्षपदी निलेश नाटेकर यांची नियुक्ती

बांदा शहरात भाजप संघटन बळकट करण्याची जबाबदारी निलेश नाटेकरांवर

बांदा (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या बांदा शहराध्यक्षपदी निलेश अरविंद नाटेकर यांची निवड करण्यात आली आहे. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच शहरातील पक्षकार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात येत आहे. नाटेकर हे पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते असून विविध सामाजिक व संघटनात्मक उपक्रमांमध्ये त्यांनी सातत्याने सहभाग नोंदविला आहे. त्यांच्या निवडीमुळे बांदा शहरात भारतीय जनता पार्टीच्या कार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. या निवडीबद्दल त्यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून आगामी काळात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याची भावना नाटेकर यांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!