नांदगाव (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत नांदगाव आणि किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगाव ग्रामपंचायत सभागृह येथे आज शासनाच्या विविध 25% / 35% सबसिडी कर्ज प्रस्ताव मार्गदर्शन मेळाव्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
यावेळी व्यासपीठावर नांदगाव सरपंच भाई मोरजकर उपसरपंच इरफान साटविलकर, ग्रामविकास अधिकारी मंगेश राणे, किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक प्रशांत पाटील, ओबीसी महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक निशिकांत नार्वेकर, अण्णा साहेब पाटील महामंडळ जिल्हा समन्वयक स्नेहल पुजारे, महीला आर्थिक विकास महामंडळ सिंधुदुर्ग चे नितिन काळे , वसंतराव नाईक महामंडळ, संत रोहिदास चर्मकार महामंडळ, महात्मा फुले विकास महामंडळ तसेच सीमा गावडे, भक्ती उंबळकर, ग्रामपंचायत सदस्य विनोद मोरये, विठोबा कांदळकर, अक्षता खोत, अनिकेत तांबे, गौरी परब, रमिजान बटवाले, पूजा सावंत आदी गावातील शेकडो महीला,युवक, युवती ,छोटे मोठे व्यवसाय करु इच्छित असलेले ग्रामस्थ उपस्थित होते.
शासनाच्या विविध कर्ज योजना प्रस्ताव करण्यासाठी कोण कोणते कागदपत्रे लागतात तसेच 5 लाख रुपये ते 50 लाखा पर्यंत कर्ज योजनांची माहिती दिली तर महीलांसाठी 35% तर पुरुषांना 25% सबसिडी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येत आहे. तर विविध महामंडळ यांच्या वतीने व्याज परतावा योजनांची माहिती दिली आहे.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश मोरजकर तर आभार सरपंच भाई मोरजकर यांनी मानले आहे.