सिनेतारका पूजा सावंत हिची उपस्थिती
कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या ४९ व्या वाढदिवसच्या निमित्ताने कनेडी बाजारपेठ सांगवे येथे महिलांसाठी पाककला स्पर्धा व होममिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परिसरातील महीला बहुसंख्येने सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ महिलेच्या हस्ते करण्यात आले. पाककला स्पर्धेत ११७ महीला सहभागी झाल्या. यावेळी महिलांनी तांदळा पासुन पदार्थ तयार करून आणून त्याची आकर्षक मांडणी केली होती. या स्पर्धेचे परीक्षण सौ बावकर व सौ राणे, कणकवली यांनी केले. या स्पर्धेचा निकाल आणि बक्षीस वितरण लगेचच पार पडले
पाककला स्पर्धा निकाल खालील प्रमाणे
प्रथम क्रमांक- निलम नामदेव कानडे ओव्हन
द्वितीय क्रमांक – रंजीता राजन सावंत मिक्सर
तृतीय क्रमांक – सान्वी गौरव तावडे कूकर
क्रमांक ४. अनुजा एकनाथ मेस्त्री
५. श्रद्धा साईबाबा काणेकर
६. आर्या प्रदीप सावंत
७. दक्षता दीपक मेस्त्री
८. शुभांगी सुरेश सावंत
९. अमिता अंकुश सावंत
१०. सारिका संतोष सावंत
४ ते १०क्रमांकाना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
होम मिनिस्टर स्पर्धा
होम मिनिस्टर स्पर्धेत परिसरातील सुमारे ९०० महीला सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेचे संचालन रश्मी आंगणे यांनी केले.
प्रथम क्रमांक – मानसी महेश नाईक फ्रिज
द्वितीय क्रमांक सेजल शाम यादव वॉशिंग मशिन
तृतीय क्रमांक – मयुरी महेश मुंज गॅस शेगडी
क्रमांक ४. समृध्दी संजय सावंत
५. राजश्री राकेश सावंत
६. कीर्ती कैलास सावंत
७.जान्हवी नार्वेकर
८. सीमा सुभाष गावडे
९. सुलोचना रमेश सावंत
१०. सुवर्णा सोमनाथ मोहिते
४ ते १०क्रमांकाना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले तसेच सर्व उपस्थितांना मोफत लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते.
प्रथम क्रमांक – LED TV
द्वितीय क्रमांक – कुलर
तृतीय क्रमांक – मिक्सर
चतुर्थ क्रमांक – कुकर
५ ते १० क्रमांकाना आकर्षक भेटवस्तू गौरवण्यात आले
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सिनेतारका पूजा सावंत हीची उपस्थीती लाभली. आयोजकांचे स्वागत आणि आदरातिथ्य पाहून भारावून गेल्या. स्पर्धेच्या आयोजना बद्दल कौतुक करताना परत येण्याचे आश्वासन देउन निरोप घेतला. कार्यक्रमात प्रसिद्ध गायक समिर अराडकर यांच्या गाण्यांनी रंगत आणली.सर्व सहभागी महिलांचे संजना संदेश सावंत (माजी अध्यक्ष जि प सिंधुदुर्ग) यांनी आभार मानले.