डॉ. प्रथमेश सावंत यांच्याकडून करंजे मतिमंद विद्यालयात अन्नदान आणि खाऊ वाटप

कै. मोहनराव सावंत यांच्या जन्मदिनाचे औचित्य

कणकवली (प्रतिनिधी) : देव, गाव, भाव यांची आठवण असू द्या’ हा कानमंत्र देणारे, समज सेवेचा ध्यास आजन्म लाभलेले कै. मोहनराव मुरारी सावंत यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची शिकवण प्रत्यक्षात आणत त्यांचे सुपुत्र आणि ठाकरे शिवसेना कणकवली तालुकाध्यक्ष प्रथमेश सावंत यांनी करंजे येथील मतिमंद विद्यालयात अन्नदान करत तसेच मुलांना खाऊ वाटप करून मदतीचा हात दिला. गरजवंतांना मदत करा या वडिलांच्या शिकवणुकीप्रमाणे आज त्यांच्या जन्मदिनी या मुलांना मदत केली. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर उमलणारा आनंद पाहून बाबांनीच आशीर्वाद दिल्यासारखं वाटलं, अशा भावना डॉ. प्रथमेश सावंत यांनी व्यक्त केल्या. यावेळी कनेडी आरोग्य केंद्र तसेच भिरवंडे पूर्वज सभागृह येथेही सामाजिक उपक्रमांनी जन्मदिन साजरा करण्यात आला.

यावेळी प्रथमेश सावंत, संदीप सावंत, अरविंद सावंत, मंगेश सावंत, विजय सावंत, संतोष सावंत, मुकेश सावंत, विशाल सावंत, मंगेश सावंत, मधु सावंत, प्रकाश सावंत, तुषार गावकर, शिवप्रसाद पेंढुरकर, बबन मेस्त्री, मुन्ना तेली, डॉ. फाटक, मतिमंद विद्यालयाचे श्री. मेस्त्री, श्री. मुणगेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!