देवगड दिवाणी न्यायालयात 30 एप्रिल रोजी राष्ट्रीय लोकअदालत

देवगड (प्रतिनिधी) : उच्च न्यायालय मुंबई, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण- मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण- सिंधुदुर्ग ओरोस यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून देवगड दिवाणी न्यायालय ‘क’ स्तर- देवगड येथे ३० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. तालुका विधी सेवा समिती- देवगड व तालुका बार असोसिएशन – देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने ही राष्ट्रीय लोकअदालत होणार आहे.

ज्या पक्षकारांचे दिवाणी न्यायालयात प्रलंबित असलेले दिवाणी व फौजदारीकडील खटले किंवा सर्व राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, स्वायत्त संस्था, ग्रामपंचायत, नगरपंचायतीकडील वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवायची आहेत, त्यांनी आपली प – करणे तालुका विधी सेवा समिती देवगड या कार्यालयाकडे लवकरात लवकर दाखल करावीत. तसेच ज्या पक्षकारांना आपले प्रकरण चर्चेद्वारे मिटवायचे असेल, अशा पक्षकारांनी वादपूर्व चर्चेसाठी या न्यायालयात हजर राहावे किंवा तसे जमत नसेल तर फोनद्वारे या न्यायालयात संपर्क साधावा. त्यानुसार उभय पक्षकारांना चर्चेची तारीख व माध्यम ठरविण्यात येईल. लोकन्यायालय यशस्वीतेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) देवगड तथा तालुका विधी सेवा समिती- देवगडचे अध्यक्ष एस. बी. वाळके यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!