तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे येथील सीताबाई परशुराम तळेकर यांचे वृध्दपकाळाने बुधवारी निधन झाले. त्या 82 वर्षांच्या होत्या. सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी सुर्यकांत तळेकर व सी.ए. संतोष तळेकर यांच्या त्या मातोश्री होत.
तळेकर यांच्यावर तळेरे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर बाजारपेठ आणि तसेच रिक्षा व्यावसायिकांनी रिक्षा बंद ठेऊन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या पश्चात मुलगे, मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.












