ट्रकने अचानाक पेट घेतला ; वाहतूक ठप्प
वैभववाडी (प्रतिनिधी) : ‘चिवा काटी भरलेल्या ट्रकने अचानक पेट घेतला. यात ट्रक आगीत जळून खाक झाला आहे. बर्निंग ट्रकचा थरार गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास भुईबावडा घाटात घडला. ट्रक चालक व क्लिनर बालबाल बचावले असून भुईबावडा घाटातील वाहातूक ठप्प झाली होती. घटनेची माहीती मिळताच वैभववाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
शेर्पे येथून सांगलीकडे चिवा काटी भरून भुईबावडा घाटातून हा ट्रक जात होता. ट्रक भुईबावडा घाटातून जात असताना गगनबावड्यापासून मागे ३ कि.मी. अंतरावर ट्रकने अचानक पेट घेतला. ट्रकचालक व क्लिनरने आग विझविण्याचा प्रयत्न केला. माञ आगीने उग्र रुप धारण केल्यामुळे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. दरम्यान या आगीत ट्रक जळून खाक झाला. घटनेची माहीती मिळताच वैभववाडी पोलिस निरीक्षक अमित यादव, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, कुलदीप पाटील, राहुल पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान घाटातील वाहातूक ठप्प झाली होती. आग विझविण्यासाठी पोलिसांनी कणकवली येथील अग्नीशामक बंब पाचरण केला. माञ सायंकाळी उशीरापर्यंत बंब पोहचला नव्हता. त्यामुळे ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला असून मोठे नुकसान झाले आहे.
वैभववाडी तालुक्यात अग्नी शामक यंत्रणा नसल्यामुळे आगी सारखी दुर्घटना घडल्यास कणकवली येथील अग्नीशामक यंत्रणेला पाचरण करावे लागते. कणकवलीतून अग्नी बंब येईपर्यंत आगीत मोठे नुकसान होते. यासाठी वैभववाडी येथे अनी शामक यंत्रणा उभारण्याची मागणी नागरीकांकडून केली जात आहे. फोटो- भुईबावडा घाटात पेट घेतलेला ट्रक