खारेपाटण एस टी बस स्थानकाची सर्व्हेक्षण समिती कडून पाहणी
खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन व महारष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांचे संयुक्त विद्यमाने संपूर्ण राज्यभर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियाना अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ्ता सर्व्हेक्षण समितीने आज शुक्रवार दी.९ मे २०२५ रोजी खारेपाटण एस टी बसस्थानकला भेट बसस्थानक परिसराची व येथील सोयी सुविधांची पाहणी केली.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान संपूर्ण राज्यभर जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येत असून आज खारेपाटण येथे आलेल्या स्वच्छ्ता सर्वेक्षण समितीमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे विभागीय वाहतूक अधिकारी शंकर यादव, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी राजेश्वर जाधव यांचा समावेश होता. त्यांनी खारेपाटण एस टी बस स्थानकाच्या प्रभारी वाहतूक नियंत्रक प्रमुख आश्विनी पेडणेकर यांची भेट घेतली घेतली व खारेपाटण एस टी बस स्थानकाच्या सद्य स्थिती बाबत आढावा जाणून घेतला. यावेळी खारेपाटण माजी सरपंच रमकांत राऊत, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर, संकेत शेट्ये, भाऊ राणे, संकेत लोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान खारेपाटण एस टी बसस्थानकाची या सर्वेक्षण समितीने पाहणी करून गुणांकन केले.तर परीक्षण दरम्यान आढलेल्या काही त्रुटीची पूर्तता करण्याच्या सूचना केल्या. तर ग्रामस्थांच्या वतीने एस टी महामंडळ खारेपाटण बस स्थानकाला देत असलेल्या सोयी सुविधांबाबत तसेच एस टी गाड्यांच्या अनियमितपणा बद्दल पूर्णतः नाराजी व्यक्त करत सर्वेशनाला आलेल्या अधिकाऱ्यां समोर समस्यांचा पाढा वाचला. तर स्वच्छ सुंदर बस स्थानक बनवा परंतु प्रवासी वर्गाला प्रथम आवश्यक असलेल्या सोयी सुविधा पुरावा अशी मागणी यावेळी ग्रामस्थानी एस टी अधिकाऱ्यांकडे केली.














