भारतीय सैन्यदलाच्या पाठीशी सिंधुदुर्गवासीय ; पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : देशाच्या सैन्यदलाबद्दल सिंधुदुर्गवासीय जनतेला अभिमान आहे. लष्कराच्यादेशात जी युद्धजन्य स्थिती आहे त्यादृष्टीने सिंधुदुर्गवासीयांशी संवाद साधत आहे. केंद्र सरकारकडून जी आवाहने केली जात आहेत, त्यांचे पालन आपण नागरिक म्हणून करायला हवे.मॉक ड्रिल मध्ये प्रशासनाने आलेल्याला मार्गदर्शन केले. जनताही त्यात सहभागी झाली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपला देश अतिरेक्यांच्या विरोधात लढा देत आहे. अतिरेक्यांनी निष्पाप पर्यटकांना पहलगाम मध्ये मारले. मोदी सरकारने या अतिरेक्यांविरोधात मोहीम उघडली आहे. अतिरेक्यांविरोधात मोठा हल्ला करण्याचे काम लष्कर करत आहे. भारताचे नागरिक म्हणून आपण सोशल मीडिया तसेच अन्य माध्यमांतून सैन्य दलाचे मनोबल वाढविणे गरजेचे आहे. आपल्याकडून लष्कराचे खच्चीकरण होईल असे काहीही करू नये. कायद्याच्या चौकटीत राहून तिरंग्याची रॅली काढली जात असल्यास जिल्हा प्रशासन सहकार्य करेल. नागरिकांनी रक्तदान शिबिर आयोजित करावीत. सैन्य दलाचे अभिनंदन सिंधुदुर्ग वासीयांनी करावे. सिंधुदुर्गातील जनता राज्य आणि केंद्र सरकार तसेच प्रशासनाला सहकार्य करेल हा विश्वास आहे. भारतीय नौदलकडून सागरी हद्द आणि मच्छी मच्छिमारांना निर्देश दिले आहेत.

मत्स्य आणि बंदर खात्याचा मंत्री म्हणून मच्छीमार बांधवाना आवाहन करतो की केंद्र आणि राज्य सरकारकडून आलेल्या नियमावलींचे तंतोतंत पालन करावे. अतिउत्साही पणा न करता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही मत्स्य आणि बंदर विकासमंत्री नितेश राणे यांनी केले.

error: Content is protected !!