जगदीश सावंत यांना आदर्श शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार प्रदान

खारेपाटण (प्रतिनिधी) : सांगवे गावचे सुपुत्र व सध्या नडगिवे येथे वास्तव्यास असलेले शेर्पे माध्यमिक हायस्कूलचे सेवानिवृत्त लिपिक जगदीश सावंत यांना नुकताच नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन (रजि.) बेळगावी व इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगाव यांच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय स्तरावरील आदर्श शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार नुकताच कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री विराप्पा मोइली व केंद्रीय मंत्री मा.रत्नमाला सावनर व बॅरिस्टर अमरसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गोवा येथे प्रदान करण्यात आला. त्यांच्या या गौरवास्पद कामगिरीबद्दल आणि मिळालेल्या पुरस्कराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिंनंदन केले जात आहे. जगदीश सावंत यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व क्रीडा क्षेत्रातील भरीव योगदानासाठी यापूर्वीही अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनचा उत्कृष्ट पंच पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झाला आहे. माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेवर संचालक म्हणून सुद्धा त्यांनी चांगले काम करत उपाध्यक्ष पदी मजल मारली आहे. तसेच माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्षपदी सुद्धा त्यांनी चांगले काम करत कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविले आहेत. खारेपाटण येथे द्विस्तरीय व्यवसाय अभ्यासक्रम ते गेली २० वर्षे शिकवित आहेत. तसेच शेर्पे गाव विकास सोसायटीचे संचालक म्हणूनही त्यांनी १५ वर्षे काम केले आहे.

जगदीश सावंत यांना प्राप्त झालेल्या पुरस्काराबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण व शेर्पे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ शेर्पे संचालक व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी आणि ग्रामस्थ यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!