खारेपाटण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न, भारतरत्न डॉ.बाबाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त खारेपाटण पंचशील नगर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पंचशील विकास मंडळ खारेपाटणचे अध्यक्ष संतोष पाटणकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.

पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने खारेपाटण पंचशील नगर बुद्धविहार येथे संपन्न होणाऱ्या डॉ. बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त खारेपाटण शहरातील इयत्ता २ री ते ४ थीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा तर इयत्ता ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून “माझा आवडता नेता डॉ.बाबासाहेब आंबेडकर” हा विषय ठेवण्यात आला आहे. सदर स्पर्धा दि. १३ एप्रिल, २०२३ रोजी जिल्हा परिषद केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे सकाळच्या सत्रात घेण्यात येणार असून विजेत्या स्पर्धकांचा बक्षीस वितरण समारंभ १४ एप्रिल, २०२३ रोजी पंचशील नगर खारेपाटण येथे सकाळी १०.०० वाजता होणार आहे.,तरी या स्पर्धेत खारेपाटणमधील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन पंचशील विकास मंडळ खारेपाटण यांच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच पंचशील नगर मर्यादित महिलांसाठी रांगोळी स्पर्धा व पाककला स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले असून विजेता महिलांना बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच लहान मुलांसाठी विविध फनिगेमचे देखील आयोजन करण्यात आले आहे. तसेच या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!