तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत मंदार चोरगे प्रथम तर साक्षी भोसले द्वितीय क्रमांकाचे मानकरी

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्त भाजपा वैभववाडी यांच्या वतीने निबंध स्पर्धेचे आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्ष, वैभववाडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा आणि इतिहासप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. “अहिल्याबाई होळकर : एक आदर्श शासिका आणि जनसेविका” आणि “शौर्य, सेवा आणि श्रद्धेचा संगम : अहिल्याबाई होळकर” या विषयांवर आधारित निबंध स्पर्धेत वैभववाडी तालुक्यातून अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत मंदार सदाशिव चोरगे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर साक्षी प्रविण भोसले हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. सदर स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध साहित्यिक कवी,लेखक प्रा. डॉ. नामदेव गवळी यांनी केले.

सर्व विजेत्यांचे व सहभागी स्पर्धकांचे भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांनी अभिनंदन केले. या स्पर्धेत यश संपादन केलेल्या स्पर्धेकांना पारितोषिक देऊन व सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते लवकरच गौरविण्यात येणार आहे. तसेच या दोन्ही विजेत्यांचे निबंध जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पुढे पाठवण्यात येणार असल्याचे निबंध स्पर्धा समन्वयक रितेश सुतार यांनी सांगितले.

error: Content is protected !!