नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल वैभववाडी येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

प्रदिर्घ आयुष्य व भव्य राजकीय वाटचालीच्या मंत्री नितेश राणेंना दिल्या सदिच्छा

वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे व भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांच्या हस्ते करण्यात आले वृक्षारोपण

वैभववाडी (प्रतिनिधी) : आज दि. २३ जून रोजी महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यासह अनेक भागात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर वैभववाडी येथे अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या वतीने कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी उपस्थितीत प्रशालेच्या प्रांगणात भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रशालेच्या आवारात शोभेची झाडे, फुल झाडे, औषधी वनस्पतींची वृक्ष लागवड करण्यात आली. प्रशालेतील सर्व विद्यार्थी झाडे घेऊन या वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी झाले होते. वृक्षा प्रमाणे प्रदिर्घ आयुष्य व त्याच्या भव्य वाढ व विस्ताराप्रमाणे राजकीय वाटचाल मंत्री नितेश राणे यांची व्हावी असे मत वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी व्यक्त केले. त्यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्था व प्रशालेच्या वतीने नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक बी. एस. नादकर, भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, आरोग्य शिक्षण व क्रीडा सभापती रोहन रावराणे , पतंजली योग समिती वैभववाडीच्या पदाधिकारी, प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!