पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त मोफत रेनकोट वाटप

मालवण (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त राकेश परब मित्रमंडळ च्या वतीने मालवण तालुक्यातील विरण बाजारपेठ येथे विजवीतरण च्या लाईनमन ना मोफत रेनकोट वाटप करण्यात आले. विजवीतरण विभागाचे लाईनमन हे वीजपुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी दिवसरात्र कार्यरत असतात. ड्युटी अवर्स न मोजता जनतेची अडचण लक्षात घेत त्याना सेवा पुरविण्यासाठी लाईनमन नेहमीच काम करतात. लाईनमन च्या या सेवाभावी वृत्ती चे कौतुक करत राकेश परब मित्रमंडळाच्या वतीने त्यांना मोफत रेनकोट वाटप करण्यात आले. यावेळी माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर, राकेश परब, दया देसाई, वडाचापाट उपसरपंच सचिन पाताडे, मसदे माजी सरपंच आंबेरकर,विलास पांजरी, पंकज परब,राजू परब, जितू परब तसेच राकेश परब मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!