पळसंब मध्ये आढळला मास्कड बुबी

आचरा (प्रतिनिधी) : पळसंब गावठणवाडी येथील स्नेहलता सतिश परब याना वहाळा लगत सापडून आलेला पक्षी हा मास्कड बुबी असल्याची माहिती आचरा येथील पक्षीमित्र डॉ. मगदूम यांनी स्पस्ट केले. माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी वनविभागाला संपर्क साधल्या नंतर त्याला अधिक सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. स्नेहलता परब यांना सदर पक्षी दिसल्या नंतर थोडासा वेगळा पक्षी वाटल्याने वन्य प्राण्यापासून धोका निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी सदर पक्ष्याला सुरक्षित जागेत ठेवत माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांना फोनद्वारे कल्पना दिली.

श्री गोलतकर यांनी वनरक्षक लक्ष्मण आमले यांना पाचारण करत सदर पक्षी त्यांच्या ताब्यात दिला. पक्षीमित्र डॉ. मगदूम यांनी दिलेल्या माहिती नुसार सदर मास्कड बॉबी (Masked booby juvenile)हे पक्षी वादळी परिस्थितीत भरकटतात. हा समुद्री पक्षी आहे. त्याची पूर्ण वाढ झाली नसून बॉबी प्रजातीतील हा सर्वात मोठा पक्षी आहे. ते पाण्याच्या वर उडत असताना अचानक वेगाने खाली झेप घेतात यामुळे मासे गोंधळून जातात आणि सहज पकडले जातात. या प्रकारे शिकार करण्याला प्लंज डायविंग ( plunge diving ) म्हणतात अशी माहिती दिली. वनरक्षक आमले यांनी सदर पक्षी हा पान पक्षी असल्याने त्याला समुद्रामार्गे सुखरूप पोहोचवण्यासाठी वनविभाग प्रयत्न करणार असून योग्य ती त्याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिले. त्यावेळी देवस्थान मानकरी योगेश कापडी, रमेश परब, प्रमोद सावंत, पप्पू सावंत, दादा पुजारे, शुभांगी पुजारे इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वनविभागाच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.

error: Content is protected !!