चिंदर ग्रामपंचायत येथे उद्या १४ जून रोजी फार्मर आयडी कॅम्प…!

आचरा (प्रतिनिधी) :चिंदर भटवाडी व सडेवाडी या तलाठी सजामध्ये येणाऱ्या महसूली गावातील शेतकऱ्यांची शेतकरी कार्डसाठी नोंदणी करण्यासाठी तलाठी कार्यालय सजा-भटवाडी (चिंदर) यांच्याकडून उद्या रविवार १४ जून रोजी ग्रामपंचायत चिंदर येथे सकाळी १०:३० ते सायंकाळी ०४:०० या वेळेत शेतकरी ओळखपत्र ( Farmer ID Card) काढण्यासाठी कॅम्प आयोजित करण्यात आला आहे.

यासाठी आधारकार्ड, आधारकार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर. (OTP करिता) आणि सातबारा किंवा आठ-अ आवश्यक असून तरी भटवाडी व सडेवाडी या तलाठी सजामध्ये येणाऱ्या महसूली गावातील शेतकऱ्यांची शेतकरी कार्डसाठी नोंदणी करणे शिल्लक आहे. अशा शेतकरी लाभार्थ्यांनी ह्या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपली ॲग्रीस्टॅक नोंदणी करून घ्यायची आहे. यासाठी तलाठी आकाश कराळे, केंद्र चालक सिध्देश नाटेकर, महसूल सेवक राहुल चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!