नांदगाव व असलदे ग्रामस्थांच्या मागणीला यश; नांदगाव तिठा उड्डाणपुलाखाली हॅलोजनचा लख्ख प्रकाश..
कणकवली (प्रतिनिधी) : नांदगाव व असलदे ग्रामस्थांनी महामार्ग अधिकाऱ्यांकडे मांडलेल्या विविध समस्यांची दखल घेत अखेर महामार्ग प्राधिकरणाकडून कार्यवाही करण्यात आली आहे. नांदगाव तिठा येथील उड्डाणपुलाखालील दोन्ही पॅसेजमध्ये अंधाराचे साम्राज्य असल्याने नागरिक, वाहनचालक व प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता.याबाबत ग्रामस्थांनी महामार्ग अधिकाऱ्यांची भेट घेऊन उड्डाणपुलाखाली तातडीने स्ट्रीट लाईट बसविण्याची शनिवारी करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी स्ट्रीट लाईट चे काम पूर्ण करत विविध ठिकाणी हॅलोजन लावल्याने लख्ख प्रकाश पडला आहे.
ग्रामस्थांच्या मागणीनंतर रविवारी महामार्ग प्राधिकरणाकडून स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्यात आली. नांदगाव ग्रामपंचायत मार्फत चार हॅलोजन देण्यात आले होते. त्यामुळे आता नांदगाव उड्डाणपुलाखालील दोन्ही पॅसेजमध्ये लख्ख प्रकाश होणार असून रात्रीच्या वेळी महिलांना ,कॉलेज मधील मुलींना,नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीपासून दिलासा मिळणार आहे.या कामामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.












