श्रावण सोमवार विशेष श्रीमद्भगवद्गीतेचा बारावा अध्याय पठण कार्यक्रम भक्तिभावात संपन्न
आचरा (प्रतिनिधी) : श्रावण महिन्याचा पहिला सोमवार २८ जुलै त्या निमित्ताने त्रिंबक गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिर येथे श्रीमद् भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायाच्या सामूहिक पठणाचा एक अनोखा अध्यात्मिक व सांस्कृतिक यांची सांगड घालणारा कार्यक्रम अत्यंत आध्यात्मिक वातावरणात नियोजनबद्धपणे संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात शिवमंत्रोच्चार, दीपप्रज्वलन आणि प्रास्ताविकाने झाली. संपूर्ण मंदिर परिसर गीतेच्या श्लोकांनी गूंजून गेला आणि श्रद्धेच्या वातावरणात न्हाऊन निघाला. कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण ठरले नाट्यरूप सादरीकरणातील श्रीकृष्ण-अर्जुन संवाद, श्रीकृष्णाच्या भूमिकेत तनुश धोंडू चिंदरकर आणि अर्जुनच्या भूमिकेत वेदांत विश्वनाथ दळवी या चिमुकल्यांनी अत्यंत आत्मीयतेने संवाद सादर केले. यदा यदा हीं धर्मस्य या श्रीकृष्णाच्या प्रवेशाने आणि त्याने संस्कृत मध्ये सांगितलेली भगवद्गीता याने उपस्थित लोकांची मने जिंकली बटूच्या भूमिकेत रुद्र जाधव, आयुष नार्वेकर, सुजन चव्हाण, सर्वेश कदम, निरज दळवी, रुद्रनाथ दळवी, मैथिली नाटेकर, मुग्ध पवार, कुणाल मुळे, समर्थ काळे, मिहीर पारकर या विद्यार्थ्यांनी सामूहिक श्लोक पठणासह प्रत्येक श्लोकाचा भावार्थ प्रभावीपणे सादर केला. या विद्यार्थ्यांना उपस्थितांकडून प्रोत्साहनपर बक्षिसेही देण्यात आली जे त्यांच्या आत्मविश्वासात भर घालणारे ठरले. कार्यक्रमाची सांगता ‘पसायदान’ या मंगलप्रार्थनेने झाली, ज्याने संपूर्ण वातावरणात आध्यात्मिक शांतीची अनुभूती दिली. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सौ. निशिगंधा नारायण वझे (मुख्याध्यापिका – शाळा चिंदर भटवाडी) यांनी अतिशय प्रभावी आणि भावस्पर्शी भाषेत केले
यावेळी श्री देव रामेश्वर मंदिर त्रिंबक ट्रस्टचे अध्यक्ष श्री रघुवीर घाडीगांवकर व सर्व ट्रस्टी सदस्य, बारापाच मानकरी, उदय मेहेंदळे, सुनिल पवार, संदिप परब, मैना कारंडे मॅडम, श्रीम. भाग्यश्री फाटक, अमृता तोरसोळकर,
पूर्वा चव्हाण, अनिता जाधव, बाळकृष्ण नार्वेकर, चंद्रसेन पारकर, मयुरी कदम, शाळा कमिटी अध्यक्ष महेश कदम, उपाध्यक्ष नवनाथ दळवी, संतोष घाडीगांवकर, विश्वनाथ दळवी, जुही तोरसळकर, दीक्षा गांवकर, बहुसंख्य ग्रामस्थ आदी उपस्थित होते.












