रोटरी क्लब ऑफ बांदाच्या अध्यक्षपदी स्वप्नील धामापूरकर; २८ जुलैला पदग्रहण सोहळा

बांदा (प्रतिनिधी) : सामाजिक व बहुविध सेवा क्षेत्रात अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब ऑफ बांदा या संस्थेच्या २०२६-२७ वर्षासाठीच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून अध्यक्षपदी स्वप्नील धामापूरकर, सचिवपदी सुदन केसरकर आणि खजिनदारपदी साईराज साळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा मंगळवार, २८ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता स्वामी समर्थ सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

आनंदी मंगल कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत मावळते अध्यक्ष शिवानंद भिडे यांनी नूतन कार्यकारिणीची घोषणा केली. यावेळी रोटरी क्लब ऑफ बांदाचे संस्थापक अध्यक्ष मंदार कल्याणकर यांच्यासह आपा चिंदरकर, सुदन केसरकर, साईराज साळगावकर, सुनील राऊळ, विराज परब, रवींद्र गवस, योगेश परुळेकर, सुधीर शिरसाट, नरसिंह काणेकर, सीताराम गावडे, फिरोज खान, आबा धारगळकर, दिगंबर गायतोंडे, हनुमंत शिरोडकर आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी आपा चिंदरकर, सचिव सुदन केसरकर, सहसचिव घनश्याम पावसकर, खजिनदार साईराज साळगावकर यांच्यासह दिगंबर गायतोंडे, हनुमंत शिरोडकर, आनंद गवस, राजाराम धारगळकर, डॉ. नारायण नाईक, रत्नाकर आगलावे, सुनील राऊळ, स्वागत नाटेकर, दिलीप कोरगावकर, मनसुख वसाणी, यशवंत आगलावे, दादा पावसकर, संतोष सावंत, विराज परब, रवींद्र गवस, योगेश परुळेकर, सुधीर शिरसाट, अनंत नाडकर्णी, प्रमोद कामत, नरसिंह काणेकर, सीताराम गावडे, दिलीप घोगळे, फिरोज खान, उत्तम सातार्डेकर, शिवानंद भिडे, मंदार कल्याणकर, वसंत राऊळ व प्रवीण शिरसाट यांची कार्यकारिणीवर निवड करण्यात आली आहे.

पदग्रहण सोहळ्यास जिल्हा सेक्रेटरी प्रणय तेली, सहाय्यक गव्हर्नर अभिषेक माने तसेच जिल्हा सेक्रेटरी राजेश घाटवळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी मावळते अध्यक्ष शिवानंद भिडे यांनी वर्षभरात क्लबतर्फे राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रमांचा आढावा घेतला.

याच पदग्रहण सोहळ्यात क्लबचे सदस्य प्रमोद कामत तसेच पत्रकार आशुतोष भांगले यांना सामाजिक व सेवाभावी कार्याची दखल घेत ‘सेवाव्रती पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.नूतन अध्यक्ष स्वप्नील धामापूरकर यांनी सर्व सदस्यांना सोबत घेऊन वर्षभर सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण व जनहिताचे विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. सूत्रसंचालन व प्रास्ताविकानंतर सुदन केसरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

error: Content is protected !!