प्रताप भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त हरकुळ बुद्रुक येथे शालेय साहित्य वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : मराठा समाजाचे युवा नेते तथा प्रतिथयश उद्योजक प्रताप भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हरकुळ बुद्रुक येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. हा उपक्रम कोटेश्वर मित्र मंडळ तसेच प्रवीण उर्फ बाळा सावंत यांच्या माध्यमातून पार पडला. गावातील विविध प्राथमिक शाळांमध्ये साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी बाळा उर्फ प्रवीण सावंत यांच्यासह ग्राम पंचायत सदस्य चंद्रकांत परब, रामचंद्र सावंत प्रसाद डोंगरे, नीलेश दळवी सीताराम सोहनी, जयदीप सोहनी सुहास जुवेकर, प्रमोद जुवेकर, अशोक जुवेकर, नूतन सोहनी, वैभव सावंत, हरकुल बुद्रुक कोटेश्वर मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!