“कुरंगावणे गाडेवाडी येथील धोकादायक विद्युत ट्रान्सफार्मर त्वरित बदलण्यात यावा”- प्राची ईसवलकर

*खारेपाटण (प्रतिनिधी) :* कणकवली तालुक्यातील कुरंगावणे गाडेवाडी येथील धोकादायक जुन्या विद्युत् ट्रान्सफॉर्मर ची आज जि.प. सदस्य प्राची ईसवलकर यांनी कुरंगवणे गावाला प्रत्यक्ष भेट देऊन प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत खारेपाटण माजी सरपंच व भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमाकांत राऊत हे देखील उपस्थित होते.त्यामुळे सदर विद्युत ट्रान्सफार्मर त्वरित बदलण्यात यावा. अशा सूचना जि.प सदस्या प्राची ईसवलकर यांनी महावितरणाच्या विद्युतकार्यालयाला केल्या.

यावेळी त्यांच्या समवेत कुरंगावणे गावचे सरपंच पप्पू ब्रम्हदंडे, माजी उपसरपंच बबलू पवार, ग्रा.पं सदस्या अंकिता सासरकले, संजय ढोबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. गेली दोन वर्षे येथील स्थानिक नागरिक हा ट्रान्सफॉर्मर त्या सोबतची पेटी बदलून द्या अशी मागणी करत होते. मात्र त्याकडे वीज मंडळाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले होते. म्हणून आज जि.प.सदस्य प्राची ईसवलकर व भाजप ज्येष्ठ कार्यकर्ते रमाकांत राऊत यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. व सदर जुना ट्रान्सफॉर्मर गणपती सणाच्या अगोदर बदलून देण्यात येईल असे आश्वासन ग्रामस्थान दिले.

error: Content is protected !!