GenZ ने आपली ताकद दाखवून दिली, विद्यार्थी हितासाठी काँग्रेसचा संघर्ष कायम राहील – आमदार सतेज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दिल्लीतील जंतर मंतर येथे पेपर फुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी कोल्हापुरात आज काँग्रेसच्यावतीने आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या कॅन्डल मार्चमध्ये युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले. राजारामपुरी जनता बाजार चौक ते सायबर चौक या मार्गावर हा मार्च झाला. सायबर चौक येथे युवक काँग्रेसतर्फे आयोजित सत्याग्रह आंदोलनाला भेट दिली.

यावेळी बोलताना,सतेज पाटील म्हणाले लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी “छात्रों की गुंज”च्या माध्यमातून पहिल्यांदा पेपर फुटीविरोधात आवाज उठवला. त्यांच्या जनजागृतीनंतर GenZ ने संघटित होऊन आपली ताकद दाखवून दिल्यावर युवा पिढीच्या दबावापुढे केंद्र सरकारला झुकावे लागले. मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरी विद्यार्थ्यांच्या हितासाठी काँग्रेसचा संघर्ष कायम राहील. सोशल मिडीयाचा गैरवापर करून भाजपने सत्ता मिळवली. आता हाच सोशल मिडीया भाजपच्या विनाशाचे कारण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी, सतेज पाटील आमदार जयंत आसगावकर,काँगेस शहराध्यक्ष प्रविण केसरकर, आनंद माने, सूर्यकांत पाटील- बुद्धिहाळकर, सचिन चव्हाण, तौफिक मुल्लाण्णी, देवश्री सतेज पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका स्मिता गवळी, गटनेते इंद्रजित बोंद्रे, राहुल देसाई, सत्यजीत जाधव, बाबासो चौगले, बयाजी शेळके, राधानगरी पंचायत समिती सभापती आर. वाय. पाटील, रणधीर मोरे, नगरसेवक संजय मोहिते, राहुल माने, विनायक फाळके, अमर समर्थ, प्रताप जाधव, विनायक कारंडे, सचिन चौगले, रोहित कवाळे, सचिन शेंडे, उमेश पोवार, अजित पोवार, रमेश पोवार, संपत चव्हाण, संजय पोवार- वाईकर, नगरसेविका दिपाली घाटगे, धनश्री कोरवी, ऋग्वेदा माने, पुष्पा नरुटे, जिल्हा परिषद गटनेते एकनाथ पाटील, सुदर्शन खोत, शिवाजी कवाळे, महेश उतुरे, विनायक सूर्यवंशी, सरलाताई पाटील, भारती पोवार, वैशाली महाडीक, श्वेता परुळेकर, उज्वला चौगले, राजदीप भोसले, संजय पटकारे,राजेंद्र साबळे, सुनिल मोदी, भैया शेटके यांच्यासह विद्यार्थी काँग्रेसचे उमेश पाडळकर, अक्षय शेळके, गौरव कांबळे, स्वराज भाट, निपुण चौगले, असिफ शेख, युवक काँग्रेसचे उदय पोवार, रियाज सय्यद, प्रथमेश साबळे, मुजप्फर पिनवाले यांच्यासह आजी- माजी नगरसेवक, युवक, युवती, एनएसयुआयचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!