खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ चा विद्यार्थी कु.वेदांत झगडे याचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

*खारेपाटण (प्रतिनिधी) :* महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने सन – २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ चा इयत्ता चौथी मधील विद्यार्थी कु.वेदांत प्रशांत झगडे याने यश संपादन केले असून त्याचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

कुमार वेदांत झगडे यांच्या यशाबद्दल खारेपाटण केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश ब्रम्हदंडे, उपाध्यक्ष संध्या पोरे तसेच माजी अध्यक्ष संतोष पाटणकर शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका आरती जोजन यांनी या विद्यार्थ्याचे अभिनंदन केले आहे. तर त्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे देखील अभिनंदन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!