यशराज प्रेरणा आचरा संघटनेचा कौतुकास्पद उपक्रम….!

जि. प. शाळा आचरा गाऊडवाडीच्या विद्यार्थ्यांना ओळखपत्र वितरण….!

आचरा (प्रतिनिधी) : आचरा येथील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या यशराज प्रेरणा संघटनेने जिल्हा परिषद शाळा आचरा गाऊडवाडीच्या शालेय विद्यार्थ्यांना शनिवार 2 ऑगस्ट रोजी ओळखपत्र प्रदान करत अजून एक अभिनव आणि कौतुकास्पद उपक्रम राबवला.

कार्यक्रमाची सुरुवात विद्येची सरस्वती मातेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. अध्यक्षस्थानी यशराज प्रेरणा संघटनेचे अध्यक्ष मंदार सरजोशी होते. मंदार सरजोशी, मानसी सरजोशी, मिताली कोरगावकर, सेजल आचरेकर यांनी विद्यार्थ्यांना यावेळी बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी संघटनेचे खजिनदार स्वप्निल गोसावी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आसिया काझी, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष नॅन्सी घोन्साल्विस, शिक्षिका ज्योती गवळी, सार्थकी जोशी, अंगणवाडी सेविका प्रणाली आचरेकर शाळा कमिटी सदस्य, विद्यार्थी आदी उपस्थित होते. शाळा मुख्याध्यापक राजेश भिरंवडेकर यांनी यशराज प्रेरणा संघटनेच्या उपक्रमांचे कौतुक करत आभार मानले.

error: Content is protected !!