कणकवली (प्रतिनिधी) : ‘विकसित भारत रोजगार व उपजीविका अभियान’ (विकसित भारत रोजगार आजीविका अभियान) अंतर्गत कणकवली तालुक्यातील हळवल आणि नांदगाव ग्रामपंचायत हद्दीत भूजल पातळी वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणारे शोषखड्डा (Soak Pit) व जलतारा कामांचा औपचारिक शुभारंभ उत्साहात पार पडला.
या शुभारंभ प्रसंगी कणकवली पंचायत समितीच्या सभापती मा. हर्षदा वाळके, उपसभापती मा. सोनू सावंत, तसेच गटविकास अधिकारी (BDO) मा. चव्हाण साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली.यावेळी पंचायत समिती सदस्य मा. गावडे साहेब, नांदगाव व हळवल गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे गावातील सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन होण्यास मदत होणार असून, जलतारा प्रकल्पाच्या माध्यमातून पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढवण्यास मोठी मदत होणार आहे. ग्रामीण भागात जलसंधारण आणि स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या या कामांचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले.










