नगराध्यक्ष नलावडें कडून सुदर्शन मित्रमंडळाला जर्सी प्रदान

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहरातील तेली आळी हर्णे आळी येथील सुदर्शन मित्रमंडळाला नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडून मोफत जर्सी प्रदान करण्यात आल्या. यावेळी सुदर्शन मित्रमंडळाचे मिथिलेश उर्फ सोनू भांडारी, बाळा डीचोलकर, प्रसाद आरोलकर, यश हर्णे, मिथुन ठाणेकर, सिद्धेश वालावलकर, चेतन फोंडेकर, गणेश वराडकर आदी उपस्थित होते. सुदर्शन मित्रमंडळा च्या वतीने सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यासाठीच नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सुदर्शन मित्रमंडळा च्या कार्यकर्त्यांना मोफत जर्सी प्रदान केल्या.

error: Content is protected !!