कणकवली (प्रतिनिधी) : नगरपंचायत चे माजी नगरसेवक, व युवा कार्यकर्ते गौतम खुडकर यांची नुकतीच भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली याबाबतचे नियुक्ती पत्र भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली आंबेडकरी चळवळीतील एक युवा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते अनेक सामाजिक शैक्षणिक, प्रश्नांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे या पदाचा उपयोग अनुसूचित जाती साठी त्यांच्या अनेक प्रश्नांच्या निराकरणासाठी केला जाईल व पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून अनुसूचित जातीला योग्य न्याय दिला जाईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी गौतम खुडकर यांची निवड












