शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केले राणे कुटूंबियांचे सांत्वन

कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव येथील वयाची शंभरी पार केलेल्या द्रौपदी बापू राणे यांचे नुकतेच निधन झाले. सामाजिक कार्यकर्ते बबली राणे, युवक कल्याण पतसंस्थेचे व्यवस्थापक दिलीप राणे यांच्या त्या आजी होत.शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी ओसरगाव येथील राणे यांच्या घरी जात त्यांचे सांत्वन केले.

error: Content is protected !!