अरुणा धरणग्रस्थाना पर्यायी शेत जमीन देता येत नसेल वन टाईम सेटलमेंट करावी

धरणग्रस्थांची मागणी..

वैभववाडी (प्रतिनिधी) : अरुणा धरणग्रस्थांना पर्यायी शेत जमीन उपलब्ध करून द्यावी. जर शेत जमीन देता येत नसेल तर शेतकऱ्यांना एक रक्कमी अनुदान (वन टाइम सेटलमेंट) दयावी. यासह अन्य मागण्याचे निवेदन  अरुणा प्रकल्प संघर्ष कृती समितीच्यावतीने पालकमंत्री नितेश राणे यांना देण्यात आले आहे.     

अरुणा धरण प्रकल्पाची सन 2019 साली घळ भरणी करण्यात आली. या धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेलेल्या आखवणे, भोम नागपवाडी येथील अनेक शेतकऱ्यांनी पर्यायी शेत जमिनीची मागणी केली आहे. त्यासाठी शासनाच्या नियमानुसार शेत जमीनीसाठी ६५ रक्कम भरली आहे. याला सात वर्षे झाली मात्र त्यावर अद्याप प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे धरणग्रस्तांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जर पर्यायी शेत जमीन देता येत नसेल तर एक रक्कमी अनुदान दयावे (वन टाइम सेटलमेंट) करावी अशी मागणी करण्यात आली आहे.   
त्याचबरोबर आखवणे, भोम नागपवाडी पुनर्वसन गावठाण या गावठाणाची नळ योजना विहीर ही मांगवली गावात सुमारे चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे. सध्या नळयोजना विजेवर चालू आहे. मात्र त्याचे येणारे बिल पाहता ती नळयोजना ग्रामपंचायतीला चालवणे मुश्किल होणार आहे. यासाठी ही नळयोजना सौरऊर्जेवर कार्यान्वित करावी. अरुणा धरण धरण प्रकल्पाचे पाणी वैभववाडी तालुक्यातील जवळपास १५ गावांना दिले जाणार आहे. त्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे मात्र ज्यांनी स्वतःच्या सर्वस्वाचा त्याग केला त्या धरणग्रस्तांच्या नवीन पुनर्वसन गावठाण मध्ये मात्र या कालव्याचे पाणी देण्याचे नियोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे या कालव्याचे पाणी पुनर्वसन गावठाणा ला देण्यात यावे अशी मागणी ही याद्वारे करण्यात आले.    

तसेच अद्यापही काही कुटुंबांना निवासी भूखंडाची ताबा पावती देण्यात आलेली नाही त्या सर्व भूखंड धारकांना ताबा पावती देण्यात यावी. प्रमाणे पुनर्वसन अपूर्ण नागरी सुविधा पूर्ण कराव्यात. अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. निवेदन देतांना अरुणा प्रकल्प संघर्ष कृती समिती अध्यक्ष आकाराम नागप, अभय कांबळे, कृष्णा नागप, संजय नागप, उदय नागप आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!