दारूच्या नशेत आंब्याच्या झाडास दोरीने घेतला गळफास

देवगड (प्रतिनिधी): देवगड पवनचक्की येथील प्रकाश आत्माराम साटम(५५) याने दारूच्या नशेत आंब्याच्या झाडास दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी स.११ वा. सुमारास देवगड पवनचक्की जवळ घडली या संदर्भात त्यांचा भाऊ आनंद आत्माराम साटम (६०) यांनी देवगड पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या घटनेनुसार देवगड पोलीस स्थानकात सि .आर.पी.सी. कलम १७४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.अधिक तपास देवगड पोलीस स्थानक पोलीस करीत आहेत.

error: Content is protected !!