वैभववाडीत अग्निशामक गाडीचे शिवसेना ठाकरे गटाकडून लोकार्पण

माजी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यकालात मंजूर झालेल्या या अग्निशमन वाहनाचे भाजपाने फुकटचे श्रेय घेऊ नये – अतुल रावराणे.

वैभववाडी (प्रतिनिधी): वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीत दाखल झालेल्या अग्निशामक गाडीचे शिवसेना ठाकरे गटाने लोकार्पण केले.नगरपंचायतीच्या समोर शिवसेना नेते अतुल रावराणे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.भाजपानंतर पुन्हा शिवसेना ठाकरे गटाने या गाडीच लोकार्पण केल्यानं शहरात यांची जोरदार चर्चा सुरू होती. नगरपंचायतीला नुकतीच अग्निशामक दलाची गाडी प्राप्त झाली आहे.या गाडावरून श्रेयवाद सुरू झाला आहे.प्रथम या गाडीचा लोकार्पण सोहळा भाजपाने केला होता.त्यापाठोपाठ आज शिवसेना ठाकरे गटाने यांचं लोकार्पण केले.यावेळी शिवसेना जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप सरवणकर, तालुका प्रमुख मंगेश लोके, नगरसेवक रणजीत तावडे,मनोज सावंत शहरप्रमुख शिवाजी राणे,शहर संघटक सुनील रावराणे,दिपक गजोबार,बाबू रावराणे आदी उपस्थित होते.याप्रसंगी अतुल रावराणे यांनी सांगितले, जिल्ह्यातील चार नगरपंचायतीना अग्निशामक दलाची गाडी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना मंजूर झाली होती.तत्कालीन नगराध्यक्षा दिपा गजोबार,संजय चव्हाण, रविंद्र रावराणे यांनी याकरिता मागणी केली होती.त्यांच्या मागणीनुसार खासदार.विनायक राऊत व आ.वैभव नाईक यांनी पाठपुरावा करून याकरिता निधी उपलब्ध करुन घेतला.शिवसेनेमुळे जिल्ह्यातील नुतन चार नगरपंचायतीना अग्निशामक गाडी उपलब्ध झाली.विरोधकांनी उगाच याच श्रेय घेऊ नये,असा टोला देखील श्री.रावराणे यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

error: Content is protected !!