मसुरे (प्रतिनिधी): बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे सुट्टीची मजा शिबीराचा शुभारंभ झाला. सहा दिवसीय शिबीराचा आनंद धुत्रे गुरुजीनी कथा सांगून शुभारंभ केला. नांदोसकर गुरुजीनी मुलांना कागदापासून बनवणारे विविध प्रकार दाखवले. किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, हरेश चव्हाण, दीपक भोगटे, आनंद धुत्रे, अर्चना धुत्रे, मनोज काळसेकर, अर्जून पेंडूरकर, वैष्णवी लाड, मनोज काळसेकर, प्रियांका भोगटे, नम्रता पावसकर, श्रीधर गोंधळी, नाईक मॅडम, पालक उपस्थित होते. विलास बांदेकर यानी मुलाना अल्पोपहार दिला.
कट्टा येथे सुट्टीची मजा शिबिराचा शुभारंभ!












