जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे शाळा पूर्व तयारी मेळावा संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी): जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे शैशनीक वर्ष २०२३-२४ मध्ये इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता शाळा पूर्व तयारी मेळावा नुकताच शाळेत संपन्न झाला.या मेळाव्याचे उद्घघाटन खारेपाटण सरपंच सौ.प्राची इसवलकर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमाला खारेपाटण ग्रा.पं.सदस्य गुरूप्रसाद शिंदे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष पाटणकर,माजी अध्यक्षा गौरी शिंदे,माता पालक संघाच्या उपाध्यक्षा प्रियंका गुरव,केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल,मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर सर, समिती सदस्य समीक्षा शेट्ये, संध्या पोरे,खारेपाटण ग्रामस्थ श्री सुहास राऊत,अंगणवाडी सेविका मोहीरे बाई आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. शाळा पूर्व तयारी मेळाव्याच्या निमित्ताने शाळेत विविध रांगोळी व आकर्षक सजावट करण्यात आली होती. त्याच बरोबर विविध ७ स्टॉल शिक्षकांनी लावले होते. या स्टॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने विविध वस्तूंची मांडणी करण्यात आली होती. तर या कार्यशाळेच्या निमित्ताने सर्व नवागत विद्यार्थ्यांचे पंचाआरत ओवाळून व पुषपगुच्छ आणि भेटवस्तू आणि गोड खाऊ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच प्राची इसवलकर,संतोष पाटणकर यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर सर यांनी केले.तर प्रस्ताविक केंद्रप्रमुख सळगुरु कूबल यांनी केले. सर्वांचे आभार शाळेच्या शिक्षिका रेखा लांघी यांनी केले.

error: Content is protected !!