माजी विद्यार्थी सेवा संस्था मुंबई च्या १५ व्या वर्धापनदिनाचे औचित्य
चौके (प्रतिनिधी): श्री शिवाजी विद्यामंदीर काळसे माजी विद्यार्थी सेवा संस्था मुंबई या संस्थेच्या १५ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून काळसे हायस्कूलच्या सभागृहात रविवार दिनांक ३० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता काळसे धामापूर ग्रामस्थ आजी माजी विद्यार्थी व हितचिंतक यांचा कौटुंबिक स्नेहमेळावा काळसे गावचे सुपुत्र आमदार सुनिल प्रभु यांच्या अध्यक्षतेखाली व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा रायगड युवा अध्यक्ष प्रमोद महाडीक, माजी विद्यार्थी सेवा संस्थेचे संस्थापक चंद्रकांत दळवी , काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळ काळसेचे अध्यक्ष हेमंत परब ( सीए.) यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. सदर कौटुंबिक स्नेहमेळाव्यानिमीत्त सकाळी ८.३० वाजता उद्घाटन व मान्यवरांचे स्वागत , सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा , दुपारी १२ ते २ महाप्रसाद , दुपारी ३ ते ६ वाजता माजी विद्यार्थ्यांच्या भजन मंडळांची सुस्वर भजने , महिलांसाठी हळदीकुंकू व लकी ड्रॉ. , सायंकाळी ६ ते ९ आजी माजी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि रात्रौ ९ .३० वा. माजी विद्यार्थी नागेश जुवेकर निर्मित ” विठाईच्या काठी” हे दोन अंकी हृदयस्पर्शी नाटक असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या स्नेहमेळाव्यासाठी सर्व आजी माजी विद्यार्थी , ग्रामस्थ आणि हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाव असे आवाहन माजी विद्यार्थी सेवा संस्था अध्यक्ष विनोद गोसावी , कार्याध्यक्ष हरेश काळसेकर , उपाध्यक्ष प्रकाश प्रभु , शशिकांत गावडे , सचिव संतोष गुराम , खजिनदार दत्ताराम नांदोस्कर यांच्यावतीने करण्यात आले आहे.












