घोणसरी गावाला प्रथमच प्रतिनिधित्व ; उद्या दाखल करणार उमेदवारी अर्ज
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील लोरे पंचायत समिती मतदारसंघातून घोणसरी गावच्या भाजपाच्या कार्यकर्त्या सौ. मानसी बाळकृष्ण उर्फ मिलिंद मराठे याना भाजपा शिवसेना युतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मानसी मराठे ह्याना भाजपाकडून एबी फॉर्म देण्यात आला असून त्या कमळ निशाणीवर लोरे पंचायत समिती मतदारसंघाची निवडणूक लढविणार आहेत. पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच घोणसरी गावाला प्रतिनिधित्व देण्यात आले असून मानसी मराठे यांच्या उमेदवारीमुळे घोणसरी गावासह मतदारसंघात उत्साह निर्माण झाला आहे. राणे कुटुंबियांचे निष्ठावान कार्यकर्ते असलेले घोणसरी गावचे माजी शिवसेना शाखाप्रमुख बाळकृष्ण उर्फ मिलिंद मराठे यांच्या मानसी ह्या पत्नी आहेत. मिलिंद मराठे हे 1990 पासून राणेंचे सक्रिय निष्ठावान कार्यकर्ते आहेत. तसेच मानसी मराठे ह्या महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला आर्थिक सबलीकरणसाठी कार्यरत आहेत. माजी सभापती मनोज रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून लोरे पंचायत समिती मतदारसंघाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असणार आहे अशी प्रतिक्रिया मानसी मराठे यांनी दिली.












