खारेपाटण पंचायत समिती मतदार संघातून महायुतीकडून गुरुप्रसाद शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने महायुती तर्फे आज खारेपाटण पंचायत समिती मतदार संघासाठी गुरुप्रसाद शिंदे यांनी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

खारेपाटण पंचायत समिती मतदार संघ हा महायुती मध्ये शिवसेना शिंदे पक्षाकडे गेल्यामुळे खारेपाटण ग्रामपंचायत सदस्य व शिवसेना पक्षाचे विभाग प्रमुख गुरुप्रसाद शिंदे यांना अगदी शेवटच्या क्षणी पक्षाने उमेदवारी जाहीर केली होती.व आज त्यांनी शिवसेना पक्षाचे वरिष्ट नेते संजय आग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खारेपाटण सरपंच व भाजप जि.प.उमेदवार सौ प्राची ईसवलकर,शिवसेना तालुका प्रमुख मंगेश गुरव,सुहास राऊत,मंगेश ब्रम्हदंडे, सुकांत वरूणकर तसेच महायुती पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!