दोन दिसांची रंगतसंगत | दोन दिसांची नाती !—लक्षात राहणारी !

दापोली कृषी विद्यापीठाच्या कृषी सम्राट गटाच्या विद्यार्थ्यांची लोरे नंबर २ व फोंडाघाट गावात आठवणीत राहणारी कामगिरी !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : डॉ . बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, यांच्या रावे कार्यक्रम अंतर्गत, दरवर्षी ग्रामीण भागातील जीवनमान, कृषी विषयक उपक्रम, शेतकऱ्यांशी संवाद, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर इ. बाबत प्रकल्प अहवाल, प्रात्यक्षिक साठी विद्यार्थ्यांचा गट ग्रामीण भागात पाठवून, त्यांचे कडून प्रकल्प अहवाल शेवटच्या वर्षी परीक्षेसाठी करून घेतला जातो.

आजवर किती गट आले, आणि कित्येक गेले सुद्धा ! सर्वांनी पाट्या टाकण्याचे काम केले. मात्र या वर्षीचा कृषी सम्राट गट लोरे नंबर २ गावा मध्ये आला आणि पहिल्याच दिवशी कामाला लागून आपल्या “अवघे धरू सुपंथ” प्रमाणे शेतकरी अबालवृद्ध, महिला, युवाई, आणि अगदी छोट्या मुलांमध्ये रममाण झाला. त्यांनी शेतकरी, पुरुष, महिलांमध्ये मनोरंजनातून शेतीचे महत्व, प्रात्यक्षिकासह दाखवीताना, शेतीला पर्याय नाही हे त्यांच्या मनावर आणि कृतीत उतरविले. आधुनिक शेतीचे फायदे, छोट्या -छोट्या प्रात्यक्षिकातून समजावताना, हा गट लोरे नंबर २ वासियांच्या कुटुंबाचाच भाग झाला.

नुकतीच त्यांची तोंडी परीक्षा, त्यांना सदैव सहकार्य करणारे कृषी संशोधन केंद्र, फोंडाघाटचे विद्यावेत्ता डॉ. विजय शेटे यांच्या केंद्रावर झाली. आणि सम्राट गटाचा कार्यकाळ लोरे नंबर २ येथे संपला. अन् जाताना तेथील शेतकऱ्यांना हुरहूर लावून गेला. फोंडा बाजारपेठेत सुद्धा त्यांनी आपली चांगली आणि सौदार्हपूर्ण ओळख निर्माण केली. तेथील जमलेल्या मित्रपरिवारांनी सुद्धा त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. असे गट आणि असे विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शन ग्रामीण भागात उपयुक्त ठरावी, अशी इच्छा शेतकऱ्यांनी व्यक्त करताना — अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेऊनी जाती ! असे मत व्यक्त केले.

error: Content is protected !!