राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत आराध्य गोडवे चे उज्वल यश

विभागीय सुवर्ण पदकासह राज्यस्तरीय कांस्य पदकावर शिक्कामोर्तब

कणकवली (प्रतिनिधी) : अकोला मुर्तीजापुर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील आराध्य परिमळा अवधूत गोडवे याने घवघवीत यश संपादन केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आणि कोल्हापूर विभागातून आराध्य याने या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते कोल्हापूर वारणानगर येथे झालेल्या विभागीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये आराध्य गोडवे यांनी सुवर्णपदक पटकावले होते त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकमेव खेळाडू म्हणून आराध्य याने अकोला येथील मुर्तीजापुर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेमध्ये सहभागी होऊन कांस्यपदकावर आपले शिक्कामोर्तब केले आहे.

आराध्य गोडवे हा कणकवली येथील आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल चा विद्यार्थी असून त्याने मास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो अँड स्पोर्ट्स अकॅडमी येथून एकनाथ धनवटे यांच्याकडून तायक्वांदो चे प्रशिक्षण घेतले आहे. आराध्याच्या या यशामुळे सिंधुदुर्गच्या शिरपेचा मध्ये मानाचा तुरा रोवला गेला आहे. या आधी आराध्य याने शालेय स्पर्धांमध्ये व तालुकास्तरीय विविध नाव स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे.

या स्पर्धेसाठी आरोग्य त्याचे प्रशिक्षक एकनाथ धनावटे व कोल्हापूर विभागाचे प्रशिक्षक उमाजी पवार यांचे मार्गदर्शन लाभले त्याचप्रमाणे आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष विद्याधर तायशेटे, हरिभाऊ भिसे सर, बुलंद पटेल सर सर्व संचालक मंडळ तसेच आयडियल इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य अर्चना देसाई व सर्व शिक्षक वृंद यांचे ही मार्गदर्शन लाभले.

आपली आई परिमळा व वडील अवधूत यांच्या प्रेरणेने मी या राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत मजल मारू शकलो असे आराध्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्याच्या यामुळे जिल्हाभरातून त्याच्यावर कौतुकचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!