चिंचवली गुरववाडी येथील सभागृह उभारणीसाठी १० लाख रुपये मंजूर

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील चिंचवली,गुरववाडी येथे आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम सन – २०२३-२४ अंतर्गत आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेत सांस्कृतिक सभामंडप बांधणे करीता सुमारे १० लाख रुपये मंजूर करण्यात आल्या बद्दल खारेपाटण भाजप शक्ती केंद्र प्रमुख श्री सूर्यकांत भालेकर यांनी आभार व्यक्त केले आहेत. जिल्हा नियोजन समिती सिंधुदुर्ग यांचेकडे सदर काम प्रस्तवित असून अंदाज पत्रकात त्याचा समावेश करण्यात आला आहे.केंद्रीय मंत्री नामदार नारायण राणे,माजी खासदार नीलेश राणे,आमदार नितेश राणे यांचे चिंचवली गुरववाडी येथे सांस्कृतिक सभामंडप बांधण्यात करीता भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.तसेच त्यांचे आभार देखील व्यक्त करण्यात आले आहेत.

error: Content is protected !!