सलग ७ वर्षे १००% निकालाची परंपरा कायम
वाणिज्य शाखेची समीक्षा माड्ये तालुक्यात तिसरी
चौके ( प्रतिनिधी) :स्व. सौ. जयश्री वामन प्रभु कला व वाणिज्य ( संयुक्त ) कनिष्ठ महाविद्यालय काळसे चा बारावीचा निकाल १००% लागला आहे. तर वाणिज्य शाखेची कुमारी समीक्षा माड्ये हिने ९०.३३ % गुण मिळवत कॉलेज मध्ये प्रथम आणि मालवण तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे.दरम्यान, वाणिज्य शाखेतून अनुक्रमे समीक्षा तानाजी माडये ९०.३३ % , लक्ष्मी राजन कोचरेकर ८६.३३ % , ईशा प्रदीप खोत ८५. ६७ % तसेच कला शाखेतून वैशाली विष्णू परब ८५.८३ % , सुजल सूर्यकांत घाडी ८०. ६७ % , रिद्धी विलास सावंत ७८.१७ यांनी प्रथम , द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावले. काळसे कनिष्ठ महाविद्यालयातून एकूण ३५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते ते सर्व उत्तीर्ण झाले असून निकाल शंभर टक्के लागला आहे. कनिष्ठ महाविद्यालय सुरू झाल्यापासून मागील ७ वर्षे सातत्याने १०० टक्के निकालाची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम राखली आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे तसेच विद्यार्थ्यांच्या यशात सहभागी असणारे विद्यार्थ्यांचे पालक आणि विद्यार्थ्यांसाठी अपार मेहनत घेऊन मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक, श्री.तुकाराम पेडणेकर व सर्व शिक्षकवर्ग यांचे काळसे धामापुर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, सीए हेमंत परब , सर्व संस्था संचालक यांनी अभिनंदन केले आहे आणि सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.