कणकवली तालुक्यात बारावी परीक्षेत प्रथम आलेल्या सेजल परब हिचा समीर नलावडे यांच्या हस्ते सत्कार

सेजल परब हिची अभिमानास्पद कामगिरी

कणकवली (प्रतिनिधी ) : कणकवली तालुक्यात प्रथम येण्याचा मान कणकवली महाविद्यालयाच्या सेजल सत्यवान परब वाणिज्य शाखेत ९४ टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाली आहे. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले तसेच सेजल हिच्या आई- वडिलांचे या यशाबद्दल विशेष कौतुक केले. यावेळी वडील सत्यवान परब, आई लीना परब, शहराध्यक्ष अण्णा कोदे, अजय गांगण, महेश सावंत, संदीप राणे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!