कुडाळ (प्रतिनिधी): निकृष्ट दर्जाच्या कामाचा आरोप झालेला कुडाळ येथील वेताळ बांबर्डे- मुस्लिमवाडी आणि महामार्ग जोडणाऱ्या पुलाचे काम आजपासून पुन्हा सुरू करण्यात आले आहे. याबाबतची तक्रार ग्रामस्थांनी केल्यानंतर भाजपचे युवा जिल्हाध्यक्ष आनंद सावंत यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत या पुलाची पाहणी केली. तसेच महामार्गाचे ठेकेदार आणि अधिकारी यांच्याशी चर्चा करत हे काम पुन्हा सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार आजपासून काम सुरू करण्यात आले आहे. यावेळी भाजप पदाधिकारी अवधूत सामंत, आरिफ मुजावर, अब्दुल रेहमान, अब्दुल्ला आगा, ननहू शेख, रोहित कदम, अरविंद बांबर्डेकर आदी स्थानिक नागरिक उपस्थित होते.